कोरोना – वैश्विक संकट | corona var marathi lekh
लेखक: दत्तात्रय रेगुडे
एक मानवी चूक व त्यामुळे जनजीवन आणि निसर्गातील झालेला बदल याचं स्पष्ट उदाहरण म्हणजे कोरोना.
विज्ञानी तंत्रज्ञान वापरण्याची भूक हीच खरी या संकटामागची कारणं. जीवन आरामदायी व सुसमृद्ध करण्यासाठी वापरात येणारं विज्ञान आता चुकीच्या दिशेने वाटचालीस लागलयं हे आता बर्यापैकी स्पष्ट होतयं.जीव सृष्टीवर घातक परिणाम करू शकणाऱ्या विषाणूंच संघटन व त्यावर कोणतीही औषधी परिणाम न करू शकणारी शक्यता हे गणित खरंतर विदारकच.माणसाच्या अफाट बुद्धीच हे वापराच धोरण आता माणुसकीला धोका करू पाहतयं. म्हणजे माणूस स्वतःच्या सुरक्षा व वर्चस्वासाठी किती खालच्या विचार स्तरावर चाललाय, हे खेदनीय.
कोव्हिड-19 विषाणूस विरोध किंवा त्यापासून बचाव करण्यास तंत्रज्ञानाने प्रगत व आर्थिक महासत्ता असलेली राष्ट्रे ही हतबल होताना दिसली, यावरून या आजाराच संक्रमण किती भयावह होत हे सार्या जगाने उघड्या डोळ्यांनी पाहिलं.या आजाराची लक्षणं व आक्रमकता लक्षात येउनही त्यावर प्रभावकारी औषध बनविण्यास येणारी अडचणी, यावरून कोव्हिड-19 विषाणूंच स्वरूप किती जटिल आहे हे स्पष्ट होतं.जागतिक स्तरावरील आर्थिक व मानसिक स्थिती अचानक बदलणं, यापेक्षा मोठा धक्का अजून कोणता असू शकत नाही.यातून सावरताना पूर्ण वर्ष सरत आलयं तरीही कोव्हिड-19 चे परिणाम स्पष्टपणे कायम आहे.यासाठी प्रत्येक देशाने आखलेली धोरणे व जनसामान्यांनी वैयक्तिक पातळीवर घेतलेली काळजी,एवढं सगळं असूनही आहे ती परिस्थिती कायम आहे.
या कोरोना काळात खुप बदल झाले.राष्ट्र स्तरावर व जनसामान्यांच्या वैचारिक पद्धतीत सुद्धा.प्रत्येक देशाने कठोरपणे काळजी घेतली व हवी ती मदतीची सादही घातली असताना सामान्य माणसाने सुद्धा माणूस म्हणून आपली माणूसकी निदर्शनास आणली.कित्येकांनी या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सढळ हाताने मदत केली अन् विशेष जनजागृती केली.
डॉक्टर,सुरक्षा यंत्रणा व सफाईवर्ग आणि समाजसेवक यांनी तर लोकांची मन जिंकली.
कोरोना या आजारानं जगाला थांबवल,लोकांना थांबवल.खूप काही शिकवलं व बरेवाईट अनुभव संपूर्ण जगास दिले. तंत्रज्ञान जितकं संपूर्ण आहे तितकेच ते घातकही याची जाण सामान्य माणसालाही झाली.
हे भयावह वातावरण प्रत्येकाने वैयक्तिक पणे विशेष काळजी घेतल्यावरच संपुष्टात येईल,व आपण यातून लवकर बाहेर पडू शकू..
धन्यवाद.